इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
भूमिअभिलेख विभागाकडून दरवर्षी 10 एप्रिलला भूमापन दिन म्हणून साजरा केला जातो. नाशिक येथे भूमापन दिन विभागीय स्तरावर सीएमसीएस कॉलेज सभागृहात साजरा झाला. सकाळचे संपादक डॉ.।राहुल रनाळकर, प्रसिद्ध व्याख्याते संदीप देशपांडे, युनिक हेल्थकेअर लिमिटेडचे डॉ.।नरेंद्र पाटील हे प्रमुख अतिथी होते. विशेष पाहुणे म्हणून भूमिअभिलेख विभागाचे सेवानिवृत्त उपसंचालक अरविंद गिरीगोसावी उपस्थित होते. यावेळी डॉ. राहूल रनाळकर यांचे सोशल मीडिया वास्तवता ऑनलाइन शिक्षण प्रसारमाध्यमे याबाबत सविस्तर मार्गदर्शन झाले.
संदीप देशपांडे यांचा विनोदाच्या गावाकडे हा हास्यविनोदात्मक कार्यक्रम आणि भूमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यावेळी विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रभारी उपसंचालक भुमी अभिलेख महेशकुमार शिंदे, उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा अधीक्षक चारुशीला चव्हाण, नंदुरबार, धुळे, जळगाव व अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कर्मचारी संघटना व कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी महेश कुमार शिंदे यांनी भूमापन दिनाचे महत्त्व, भूमी अभिलेख विभागाची प्रगती, भविष्यातील आव्हाने यांचा लेखाजोखा मांडला. ब्रिटिश काळापासून ते आजतागायत वापरण्यात आलेल्या मोजणी साहित्याचे प्रदर्शन कार्यक्रमात मांडण्यात आले होते. यात शंकू साखळी, फलक यंत्र, ईटीएस मशीन, जीपीएस रोवर याविषयी उपस्थितांना माहिती देण्यात आली. भूमापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाल्याची माहिती नाशिक जिल्हा भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जगताप यांनी दिली.