इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
मुंबई आग्रा महामार्गावर सकाळपासून आज तीन अपघात झाले. वाडीवऱ्हे जवळ रायगड नगर गावाजवळ नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या MH 15 AE 6605 वाहनाने ओव्हरटेकच्या नादात वाळूचा डंपर MH 06 K 3150 ह्याला जोरात धडक दिली. हा अपघात आज दुपारी 1 वाजेच्या दरम्यान झाला. ह्या अपघातात घोटी येथील प्रसिद्ध निळकंठ हॉस्पिटलचे डॉ. ज्ञानेश्वर बळीराम महाजन वय ५४ रा. घोटी ता. इगतपुरी हे ठार झाले आहेत. अपघात घडला त्यावेळी इगतपुरी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके हे तिथून जात होते. त्यांनी तातडीने अपघात समयी मदतकार्य केले. गंभीर जखमीला उपचारासाठी त्यांच्या वाहनात टाकले असतांना १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका दाखल झाल्याने पुढील उपचारार्थ जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. गोरख बोडके यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. वाडीवऱ्हे पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून तपास सुरू केला आहे.