इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१
आपली नोकरी करतांना नाभिक समाजाच्या व्यथा समजून घेऊन तळागाळातील बांधवांच्या प्रश्नावर वाचा फोडणारे किरण बिडवे यांचा खूप मोठा आदर्श आहे. त्यांच्या माध्यमातून समाजातील घटकांना न्याय मिळाला असल्याचे प्रतिपादन नाभिक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवानराव बिडवे यांनी केले. कोपरगाव येथे किरण बिडवे यांनी ३३ वर्षे एसटी महामंडळात सेवा बजावली. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ पुरस्कृत सलून असोसिएशनच्या वतीने नाशिक जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, ॲड. सुनिल कोरडे यांनी सत्कार केला. याप्रसंगी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष दादा काळे, नाभिक एकता महासंघाचे संजय वाघ, जेष्ठ नेते सुभाष मामा बिडवई, नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष मनोज वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी किरण बिडवे यांचे भाषण करताना त्यांना अश्रू अनावर झाले. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. एसटी महामंडळात काम करीत असताना गोरगरिबांची सेवा करण्याची संधी मिळाली. यात पत्नीची साथ मिळाली असे ते म्हणाले. सलून असोसिएशन नाशिक जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, रमेश बिडवे, ॲड. सुनिल कोरडे, मछिंद्र कोरडे, राजेंद्र बिडवे, पत्रकार लक्ष्मण सोनवणे, किरण कडवे, इगतपुरी आरपीआय तालुकाध्यक्ष आनंद बर्वे, संतोष सोनवणे, विजय दुभाषे आदी नाभिक बांधव उपस्थित होते.