
संतोष कथार । इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०
मविप्रच्या महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयाचे प्राध्यापक व प्रसिद्ध चित्रकार डॉ. राजीव देशमुख यांनी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे रेखाचित्र काढून राजभवननात जाऊन भेट दिले. राज्यपालांनी स्वतःचे स्केच पाहिल्यावर ते अत्यंत प्रभावित झाले. डॉ. राजीव देशमुख यांनी राज्यपाल महोदय यांचे अतिशय उत्कृष्ट असे पेन्सिल स्केच मुंबई येथील राजभवनात जाऊन त्यांना भेट दिले. त्यांच्या सोबत पत्रकार संतोष कथार, अभिषेक देशमुख आदी उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी डॉ. राजीव देशमुख यांच्या कलेचे भरभरून कौतुक केले. त्यांनी याबाबत पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पत्रात म्हंटले आहे की पेन्सिल स्केच अतिशय सुंदर व वास्तव झाले असून आम्हाला सर्वाना ते खूप आवडले आहे. ज्ञानदानाचे पवित्र कामकाज करत असताना आपण चित्रकलेची आवड कौतुकास्पद आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन. राज्यपाल यांच्या भेटीसाठी राजभवन मुंबई येथील उल्हास मुणगेकर, उमेश काशीकर, प्रभाकर पवार यांनी विशेष सहकार्य केले. प्रभाकर पवार यांनी मुंबई राजभवनची संपूर्ण माहिती देऊन ब्रिटिशकालीन असलेल्या भुयाराची माहिती सांगितली.राजभवनात असलेल्या सर्व वास्तूची सविस्तर माहिती दिली.