इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
वाढदिवस असला हणजे हारफुलें, केक आणि इतर महागड्या वस्तूंचा व्यर्थ खर्च होतो. ह्यातून कायमस्वरूपी उपयुक्त ठरेल असे मात्र काहीही होत नाही. यामुळे वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीला काही भेटवस्तू दिल्याचे समाधान मात्र अजिबात लाभत नाही. अशा स्थितीमध्ये इगतपुरी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी आदर्श संकल्पना उपयोगात आणली आहे. इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी व्यर्थ वस्तूंचा उपयोग करणे टाळून तालुक्यातील सामान्य नागरिकांना उपयोगी ठरणाऱ्या वस्तू भेट दिल्या आहेत. परमेश्वर कासुळे यांच्या वाढदिवसानिमित्त तहसील कार्यालयात नागरिकांना बसण्यासाठी दर्जेदार खुर्च्या त्यांनी दिल्या आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांचा पिंड मुळातच लोकांच्या कल्याणासाठी काम करणारा आहे. त्यामुळेच इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांचे लोकांसाठी उपयुक्त काम त्यांना भावले. यापूर्वी त्यांनी स्वागत कमान, बाके, कोरोनाची काळजी घेण्यासाठी आवश्यक चीजवस्तू तहसीलदार कार्यालयाला दिल्या आहेत. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी अनोखी भेट दिली आहे. तहसीलदार कार्यालयात तालुक्याच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी त्यांनी दर्जेदार खुर्च्यांची भेट दिली. जन्मदिनाच्या अनुषंगाने नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंची भेट दिल्याने परमेश्वर कासुळे यांनी गोरख बोडके यांचे ऋण व्यक्त केले आहेत.