इगतपुरीनामा न्यूज, दि. २
घोटी खुर्द वाडी येथील जिल्हा परिषद शाळेला महिंद्रा कंपनीकडून संपूर्ण शैक्षणिक अभ्यासक्रमासह इंटरअँक्टिव्ह पॅनल प्रोजेक्टर देण्यात आला आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्याचा फायदा होणार असल्याने सर्व विद्यार्थी शिक्षक पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी वर्गाने आनंद व्यक्त केला. गोंदे औद्योगिक वसाहतीमधील महिंद्रा इंटरटेड कंपनी सामाजिक कामात अग्रेसर आहे. कंपनीने आतापर्यंत जवळपास ४० शाळांमध्ये असे प्रोजेक्टर भेट देऊन तालुक्यामध्ये डिजिटल क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. शाळेला दिलेल्या इंटरअँक्टिव्ह पॅनलमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन व अध्यापन प्रक्रियेमध्ये सुलभता येऊन शाळेची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण तयार होऊन समाज सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
आज झालेल्या लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धामणगावचे केंद्रप्रमुख मधुकर दराडे होते. कंपनीचे व्यवस्थापक संदीप दुसाने, सुनील तिडके यांच्या हस्ते फित कापून संचाचे उदघाटन करण्यात आले. स्वप्नील धांडे, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष निवृत्ती नाठे, रुंजा धोंगडे यांच्या प्रयत्नाने हा संच शाळेला मिळाला असल्याने त्यांचा सन्मान शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी महिंद्रा कंपनीचे व्यवस्थापक संदीप दुसाने, सुनील तिडके, स्वप्नील धांडे, निवृत्ती नाठे, बाळासाहेब टोचे, माजी सरपंच बाळासाहेब कोकणे, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष नारायण लोहरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवृत्ती लोहरे, सरपंच ताई माणिक बिन्नोर, उत्तम बिन्नर, कार्याध्यक्ष विनायक पानसरे, चंद्रकांत बांगरे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर देसले, केंद्रप्रमुख मधुकर दराडे, माणिक बिन्नर, सुरेश रोंगटे, शंकर जाधव, हिरामण बिन्नर, जगन गातवे आदी मान्यवर उपस्थित होते.