प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
इगतपुरी पंचायत समितीच्या सदस्या तथा माजी उपसभापती जिजाबाई राजेंद्र नाठे यांच्या १५ व्या वित्त आयोगाच्या सेस निधीतुन मुकणे येथे भुमिगत गटार कामाचे भुमीपुजन करण्यात आले. मुकणे येथे होणाऱ्या या भुमिगत गटारीमुळे स्वच्छता व सांडपाण्याची योग्य विल्हेवाट होणार असल्याने येथील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, मुकणेचे जेष्ठ नागरिक पोपट राव, सरपंच हिरामण राव यांच्या हस्ते कामाचे भुमीपूजन करण्यात आले. मुकणेचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे येथे विकासकामे होत असुन पंचायत समितीच्या माध्यमातून राजेंद्र नाठे यांनी भुमिगत गटार काम दिल्याने विकासकामांमध्ये वाढ झाली असल्याची प्रतिक्रिया मुकणे गावचे जेष्ठ नागरिक पोपट राव यांनी दिली.
यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, पोपट राव, मुकणेचे सरपंच हिरामण राव, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती आवारी, मोहन बोराडे, भास्कर आवारी, निवृत्ती राव, गणेश राव, ज्ञानेश्वर राव, अनिल राव, राजाराम आवारी, त्र्यंबक आवारी, काळु आवारी, बाळासाहेब जाधव, खंडू बोराडे, शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब आवारी, सुनील राव, संदीप गव्हाणे, अंबादास धोंगडे, ग्रामसेवक दीपक पगार, तानाजी खातळे, संदीप गव्हाणे, बाळू गुळवे, जितु पवार, काशीनाथ भोर, समाधान धांडे आदींसह मुकणे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.