इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
विद्यार्थ्याच्या जीवनात शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे असून चांगले संस्कार व चांगला मार्ग दाखविण्याचे कार्य शिक्षक उत्तम प्रकारे करतात. म्हणून समाजात आजही शिक्षकाला मानाचे आणि आदराचे स्थान आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी केले. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भाबड बोलत होते.
प्राचार्य भाबड आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणात आमूलाग्र बदल झाला असून विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बदलत्या काळात वेगवेगळी कौशल्ये संपादन करणे आवश्यक आहे.
उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक कार्याचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांच्या वक्तईने कार्तिक गिळंदे याने आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळातील विद्यार्थ्यानी याप्रसंगी महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. कार्यक्रमाला प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. बी. सी. पाटील, प्रा. एस. के. शेळके, प्रा. के. के. चौरसिया, प्रा. आर. एम. आंबेकर, प्रा. डॉ. के. एम. वाजे, प्रा. ए. एस. वाघ, प्रा. सी. डी. चौधरी, प्रा. एल. डी. देडे, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. यू. एन. सांगळे यांनी केले.