खासदार हेमंत गोडसेंच्या प्रयत्नांनी नाशिक मुंबई महामार्ग ते सिन्नर घोटी मार्गाचे अंतर होणार कमी
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
नाशिक मुबई महामार्गाजवळच्या पाडळी देशमुखकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाचे उदघाटन आज इगतपुरीचे मठाधिपती माधव महाराज घुले, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इगतपुरीचे मठाधिपती हभप माधव महाराज घुले होते. माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, शिवसेना माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, वाडीवऱ्हेचे ग्रामपंचायत सदस्य गोविंद डगळे, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रामदास धांडे, गोंदे दुमालाचे माजी सरपंच गणपत जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नाशिक मुंबई महामार्गाच्या जवळच असलेल्या पाडळी देशमुखकडून सिन्नर घोटी राज्य मार्गाकडे जाण्यासाठी रेल्वेच्या अरुंद पुलामुळे मोठा वळसा घ्यावा लागत होता. ह्या पुलाची रुंदी वाढवावी यासाठी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू केला होता. या मागणीला खासदार हेमंत गोडसे यांनी ह्या पुलाची रुंदी वाढवल्यास नाशिक मुंबई महामार्ग हा सिन्नर घोटी राज्यमार्गाला जोडला जाईल. या दरम्यानच्या गावांनाही याचा मोठा फायदा होईल ही बाब लक्षात घेऊन रेल्वेच्या अधिकाऱ्यांना याबाबत सुचना केल्या. या कामाच्या आदेशानुसार रेल्वे विभागाने या कामाला प्रत्यक्षात सुरवात केली आहे.इगतपुरीचे मठाधिपती माधव महाराज घुले व खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते आज ह्या कामाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, देविदास जाधव, विष्णु धोंगडे, घोटी बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, मुकणेचे सरपंच हिरामण राव, जानोरीचे सरपंच अर्जुन भोर, अशोक महाराज धांडे, किरण धांडे, मनोहर जाधव, रुंजा धोंगडे, साहेबराव धोंगडे, दिलीप मुसळे, रवींद्र घाटेसाव, रतन धांडे, फकिरराव धांडे, दिनेश धोंगडे, शिवाजी जाधव, संजय धोंगडे, तानाजी धांडे, बजरंग वारुंगसे, अरुण भोर, सजन नाठे, सोमनाथ चारस्कर, बापु वारघडे, रामदास वारुंगसे, भानुदास धांडे, लखन धांडे, अंबादास धोंगडे, सुरेश ढगे, गणेश धांडे, सूरज ढगे, माधव नाठे, सोहम धांडे, रेल्वे खात्याचे वरीष्ठ अधिकारी एन. बी. नवसारे, वायकुंठे, मोहन बोरसे, रामदास शिंदे, सुभाषचंद्र शर्मा आदींसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रेल्वे विभागाचे एन. बी. नवसारे यांनी तर सूत्रसंचालन प्रल्हाद धांडे यांनी केले.