
इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
भारतीय वृत्तपत्रांची परंपरा उज्ज्वल आणि प्रेरणादायी आहे. ही परंपरा सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इतिहासाशी इतकी निगडीत आहे, की वृत्तपत्रांचा इतिहास हा सामाजिक व राजकीय चळवळींचा इतिहास आहे ,असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणातून केले. सामाजिक जबाबदारी म्हणून महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून सामाजिक प्रबोधन करत आहे. त्यामुळे यामध्ये पत्रकारांना महत्वपूर्ण स्थान आहे. पत्रकार समाजातील प्रश्नांना वाचा फोडत असतात असे ते म्हणाले.
यावेळी बाळशास्त्री जांबेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पत्रकार दिनाचे औचित्य साधुन पत्रकार बंधूचे सन्मान करत महाविद्यालयाचे प्राचार्यशिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पत्रकार कमलाकर अकोलकर, देवयानी ढोन्नर, गोकुळ पवार, सकाळ सत्रप्रमुख, प्रा. संदीप गोसावी, डॉ. शरद कांबळे, डॉ. अशोक भवर, प्रा. भागवत महाले, डॉ. मिलिंद थोरात, प्रा. विनायक पवार उपस्थित होते. पोपट महाले यांना जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला बद्दल अभिनंदन करण्यात आले. पत्रकार कमलाकर अकोलकर, गोकुळ पवार, देवयानी ढोन्नर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. भागवत महाले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अशोक भवर यांनी केले.