इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
बदलत्या काळात मानवी जीवन धोक्यात आल्याने स्वच्छता आणि आरोग्यासाठी स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी महामारीच्या काळात आदिवासी बांधवांना जनजागृती करत २ लाख ३७ हजार मास्क आणि ५० हजार साबण सँनिटायझरचे वाटप करून सामाजिक दायित्व जपले असे प्रतिपादन एनजीओ समन्वयक नितिन तुरनर यांनी केले. मविप्रच्या त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आणि केंद्रीय युवा विकास कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या कु.रोहिणी तुरनर, प्रा. संदीप गोसावी, आयक्युएसी समन्वयक डॉ. शरद कांबळे, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा. समाधान गांगुर्डे, प्रा. ए. एस. खाडे, डॉ. मिलिंद थोरात, प्रा. मनोहर जोपळे यांचे सहकार्य लाभले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे म्हणाले की, सीवायडीअ प्रमुख नितिन तुरनर, कु. रोहिणी तुरनर या दोघा भावंडांनी घेतलेल्या सामाजिक कार्याचा अभिमान वाटतो. समाजसेवक आणि एनजीओमुळे ग्रामीण आदिवासी भागात गोरगरिब बांधवांना रोजगाराचा प्रश्न, संकट दूर होण्यात मदत झाली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना १५०० हून अधिक मास्क आणि साबण मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. समाधान गांगुर्डे यांनी केले. विभागप्रमुख प्रा. नीता पुणतांबेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मिलिंद थोरात यांनी तर आभार प्रा. ए. एस. खाडे यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. अशोक भवर, डॉ. नितिन बोरसे, प्रा. भागवत महाले, डॉ. संदीप निकम, प्रा. कोठावदे, प्रा. सुलक्षणा कोळी, प्रा. ज्ञानेश्वर माळे, प्रा. निलेश म्हरसाळे, प्रा. मनोहर दुगजे, डॉ. संदीप माळी, प्रा. पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.