वाल्मिक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
शिवसेनेच्या माध्यमातुन काम करण्याची धारणा आसेल तर कोणतेच काम अशक्य नाही. तेच काम युवा नेतृत्व विठ्ठल लंगडे यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या विकास कामांमुळेच उपसभापती कामाची पावती मिळाली आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी केले. ते इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते गणातील तळाेघ येथे कार्यक्रमात बोलत होते. पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठल लंगडे यांच्या विशेष प्रयत्नातुन 2 अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण व विविध कामाच्या भुमिपुजन प्रसंगी बोलत होते. यावेळी विविध विकास कामाचे भुमिपुजन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय आप्पा करंजकर, माजी आमदार निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, सभापती सोमनाथ जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
ज्येष्ठ नेते रघुनाथ तोकडे, रमेश गावित, नंदलाल भागडे, माजी तालुका प्रमुख सुर्यकांत भागडे, सरपंच अनिल भोपे, प्रशांत कडु, रामदास गव्हाणे, मारुती आघाण, सहायक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, एकात्मिक बालविकास विभागाचे पंडीत वाकडे, वंदना सोनवणे, शाखा अभियंता संजय बोराडे, हमीद शेख, माजी सरपंच तात्यापाटील भागडे, उपसरपंच भाऊराव भागडे, माजी सरपंच हरीश चव्हाण, नगरसेवक संपत डावखर, अरुण भागडे, देवराम म्हसणे, तळोघचे सरपंच संतु भगत, उपसरपंच भगीरथ कडु, ग्रामपंचायत सदस्य जनार्दन लंगडे, अनिल लंगडे, जालींदर गोईकणे, मोहन भगत, हरीश्चंद्र लंगडे, खंडु लंगडे, भारत भगत, सपना लंगडे, शितल भगत, ताईबाई भगत, हिराबाई गोईकने, सरू भगत, गोरख लंगडे, मच्छींद्र गोईकने, ग्रामसेवक सुनिल वाहुळे आदी उपस्थित होते.