डॉ. कल्पना नागरे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
निफाड तालुक्यातील सारोळे थडी येथे दरवर्षी चंपाषष्ठी उत्सव जल्लोषात साजरा करतांना यानिमित्ताने बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम साजरा केला जातो. सालाबाद प्रमाणे येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पाडला. गाड्या ओढण्याचा यावर्षीचा मान खंडोबा महाराज भक्त सोमनाथ बेंडकुळे यांना देण्यात आला. कोरोना, अतिवृष्टी सारख्या समस्यांनी ग्रस्त असूनही गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रमात सहभाग उल्लेखनीय होता. बारा गाड्या ओढल्यानंतर रात्री खंडोबाची तळी भरणे, जागरण गोंधळ कार्यक्रम पार पाडला. यावेळी सरपंच आव्हाड यांनी गावावर आलेले संकट टळू दे अशी प्रार्थना खंडोबा महाराजांना केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थांनी परीश्रम घेतले. सोमनाथ बेंडकुळे यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीने सरपंच यांनी आभार मानले. चंपाषष्ठी निमित्ताने गेल्या पाच वर्षांपासून अन्नदान आणि महाप्रसाद कार्यक्रमाला योगदान देणारे शिवाजी किसन भालेराव, दत्तात्रय कांगणे, संजय कांगणे यांचाही समस्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.