
इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
इगतपुरी तालुक्यातील माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शाल टाकून त्यांना राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश दिला. इगतपुरी तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रारंभापासून हरिश्चंद्र चव्हाण राजकारणात सक्रिय होते. अतिशय कमी वयात त्यांच्याकडून समाजोपयोगी कामे झाली. त्यांच्या राष्ट्रवादीत झालेल्या प्रवेशाने इगतपुरी तालुक्यात राष्ट्रवादीचे घड्याळ विजयाच्या दिशेने भरारी घेईल असे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी खा. शरद पवार यांना सांगितले. जनसेवा हे व्रत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रीयतेने लोकांची सेवा करील असे हरिश्चंद्र चव्हाण यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले. पक्ष प्रवेशावेळी इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके उपस्थित होते. दरम्यान हरिश्चंद्र चव्हाण यांचे इगतपुरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.