इगतपुरीनामा न्यूज, दि. २
मविप्र समाजाच्या इगतपुरी महाविद्यालयात वाणिज्य मंडळाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्रमचे आयोजन करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बिटको महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय तुपे, केटीएचएम महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. वसंत बोरस्ते यांनी उपस्थिती दर्शवली. डॉ. संजय तुपे यांनी आपल्या मार्गदर्शनातून विदेशातील शिक्षण पद्धती व भारतीय शिक्षण पद्धती यातील फरकाची मिमांसा केली. डॉ. वसंत बोरस्ते यांनी आपल्या मार्गदर्शनातून सीबीसीएस पॅटर्न, क्रेडिट पॉईंट्स, करिअरच्या संधी इत्यादी गोष्टी मांडल्या. प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापक ए. वाय. सोनवणे यांनी केले. कुमारी संध्या गव्हाणे हिने सूत्रसंचालन आणि वैभव शिंदे याने आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी कार्यक्रमासाठी प्राध्यापिका एस. के. शेळके, जे.आर. भोर, आर. आर. जगताप, जी. एस. लायरे, एम. आर. धेबडे, बी. सी. पाटील, एम. बी. कांबळे, डी. के. भेरे, यू. एन. सांगळे, एल. सी. देवरे तसेच इतर सर्व प्राध्यापकांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमासाठी विद्यार्थांनी बहुसंख्येने प्रतिसाद नोंदवला.