प्रहार दिव्यांग संघटना व पंचायत समिती इगतपुरी यांच्या सौजन्याने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

वाल्मीक गवांदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २

प्रहार दिव्यांग संघटना व पंचायत समिती इगतपुरी यांच्या सौजन्याने उद्या ३ डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बचतगट महामेळावा, युआयडी कार्ड रजिस्ट्रेशन, ५ टक्के निधीचा योग्य खर्च याची शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम इगतपुरी पंचायत समिती येथे होणार असुन तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मानकर, तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, उपाध्यक्ष सपन परदेशी, विलास कनकट, अशोक ताथेड, मंगेश शिंदे, मुक्ता गोवर्धने, रमेश रायकर आदी पदाधिकाऱ्यांनी यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!