कवी – जी. पी. खैरनार, नाशिक, ९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
कर्म करुनिया ज्योती,
महात्मा लोकांचे झाले !
अंधश्रद्धा नाकारण्या,
लढवय्ये जन्मी आले !!
दलितांना न्याय देण्या,
चिखल धोंडे झेलले !
दीन दुबळ्यांचे वाली,
महात्मा ज्योतिबा फुले !!
महिलांच्या शिक्षणाची,
दारे केली त्यांनी खुले !
सती प्रथा बंद करु,
लोकांना सांगत गेले !!
खुला करी आड स्वतः,
पाणी पाजते जाहले !
शिक्षण देण्या दलिता,
शिकवली सारी मुले !!
जातीय धर्म निर्माण,
मानवाने सारे केले !
अस्पृश्यता दूर होण्या,
संघर्ष करत गेले !!
स्पृश्य-अस्पृश्य विचार,
थोतांड दूर सारिले !
शिक्षित पिढी घडण्या,
आयुष्य लोका वाहिले !!
कष्टाळू शेतकऱ्यांचे,
दुःख मनी तया झाले !
शेतकऱ्यांचा आसुड,
पुस्तक त्यांनी लिहिले !!
कर्मकांड बंद होण्या,
लोका बोलत राहिले !
स्त्री पुरुष समानता,
निधर्मी वसा जपले !!
ज्योती सोबती सावित्री,
साथ देऊन लढले !
विधवा स्त्री विवाहाचे,
दोघे प्रणेते जाहले !!
शेण चिखल मातीचे,
शिंतोडे अंगी झेलले !
स्त्री शिक्षित करण्या,
क्रांती धनुष्य पेलले !!