इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
उत्तम गायकर यांच्याकडून
२३ मार्च शहीद दिनानिमित्त देशात ९० हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले. ह्या एकाच वेळी रक्तदान करण्याच्या कार्यक्रमाचे औचित्य साधुन नाशिक जिल्ह्यातून फक्त इगतपुरी तालुक्यात भव्य रक्तदान शिबिर राबवण्यात आले. तालुक्यातील आशाकिरणवाडी वाघेरे ( मोगरे फाटा) या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत कर्नल देविदास पोरजे यांचे हस्ते झाले. यावेळी सेवानिवृत जवान विजय कातोरे, अनिल जाधव, सीआरपीएफ जवान युवराज कुंदे, दौलतराव गांगुर्डे, सभापती सोमनाथ जोशी व आयोजक आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शाहिर उत्तमराव गायकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान करण्यासाठी विविध गावच्या नागरिकांनी सहभाग नोंदविला. यावेळी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, समनेरेचे सरपंच साहेबराव जाधव, मालूंजेच्या सरपंच दीपाली गायकर, मोगरेचे सरपंच गोविंद जाखेरे, सोमजचे सरपंच मच्छिंद्र कुंदे, घोटी बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे, मनसेचे प्रताप जाखेरे आदींनी रक्तदान करून शिबिराला प्रारंभ केला. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रत्येकाने रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी सरपंच साहेबराव जाधव, माजी सरपंच मोहन भोर, श्रीराम गायकर, नामदेव खोकले, प्रताप जाखेरे, शिवाजी गायकर, गणेश गतीर, दुर्गेश गायकर, सुरेश जाधव, सूर्यभान उगले, विष्णु उगले, रमेश भोर, ओमकार गायकर, गणेश दराणे उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयाचे सहकारी, आनंदतरंग फाउंडेशनचे संस्थापक शाहीर उत्तमराव गायकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.