यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम

मुंबई : दरवर्षी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कार दिले जातात. सामाजिक व क्रीडा विभागात एक युवक व एक युवती यांना विशेष कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा क्रीडा पुरस्कार’(युवक व युवती) व ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा सामाजिक पुरस्कार’(युवक व युवती) असे एकूण चार पुरस्कार दिले जातात. क्रीडा व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन इतर युवांसमोर एक आदर्श ठेवणार्या युवा वर्गाच्या कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्याचा यामागे उद्देश आहे. पुरस्काराचे यंदाचे एकविसावे वर्ष आहे.

महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडूंच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवा आंदोलनाच्या क्षेत्रात विधायक व भरीव कार्य करणार्या युवक-युवतींची समाजाला ओळख व्हावी हे या सामाजिक युवा पुरस्काराचे उद्दीष्ट आहे. रु. 21,000/- चा धनादेश, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. उपरोक्त दोन्ही क्षेत्रांमधील मान्यवर व्यक्तींचा सहभाग असलेल्या निवड समितीमार्फत अंतिम पुरस्कारार्थींची निवड होणार आहे.

पुरस्कारासाठी व्यक्तीचे वय 31 डिसेंबर 2021 अखेरीस 35 वर्षांच्या आत असले पाहिजे. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व ऑनलाइन फॉर्म www.ycpmumbai.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन भरण्याची अंतिम तारीख बुधवार, दि. 15 डिसेंबर 2021 असून या पुरस्कारासंबधी अधिक माहितीकरीता संतोष मेकाले – 9860740569 या क्रमांकावर अथवा navmaharashtra@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधावा. असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे व युवा अभियानाच्या राज्य संयोजन समितीने केले आहे.

युवा सामाजिक पुरस्कार ऑनलाइन फॉर्म लिंक : https://forms.gle/7ayCo2bEobyjjYUM7

युवा क्रीडा पुरस्कार ऑनलाइन फॉर्म लिंक : https://forms.gle/n5AaqFdVXNZ4MtJp9

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!