इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्व। पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पंडीतजी यांच्या कार्यामुळेच देश एकविसाव्या शतकात पदार्पण करत असताना जगाच्या नकाशावर अव्वल स्थानी पोहोचला आहे. हरितक्रांतीमुळे शेतकरी स्वयंभू करण्यामागे त्यांचा उदात्त हेतू होता. म्हणून त्यांच्या कार्यास देश विसरू शकत नसल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव भास्कर गुंजाळ यांनी काढले
घोटी येथील विश्रामगृहावर पंडितजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष जनार्दन माळी, जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, जिल्हा चिटणीस देवराम नाठे, भास्कर खोसकर, जेष्ठ नेते निवृत्ती कातोरे, सेवादल अध्यक्ष दिलीप पाटील, इगतपुरी शहराध्यक्ष संतोष सोनवणे, अनु जाती विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पंडित, संतोष जगताप, ज्ञानेश्वर कडू, प्रकाश दालभगत, योगेश सुरुडे, विश्वजित अहिरे, राजू गांगड, खंडू परदेशी, पवन सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.