कवी भास्कर जाधव, कृष्णनगर, ता. इगतपुरी
सूर्य देवाच्या उदयापासून,
सूर्य देवाच्या अस्तापर्यंत,
घामाच्या धारेपासून ते,
पिकांच्या मोहरांपर्यंत,
कष्टाचा डोंगर रचूनही….
मजवर हा अन्याय का ???
दिवसांची रात केली,
अर्धांगिनीने साथ दिली,
श्रमाची माती केली,
अन् मातीचे मोती,
एवढे दान करूनही….
मजवर हा अन्याय का ???
बक्कळ दुष्काळ सोसला,
भव्य जनसागर पोसला,
मजसी म्हणती,
सृष्टीच्या लेकरा,
महान म्हणती तुम्हीच ना……..
मजवर हा अन्याय का ???
काबाड कष्ट करून
अंग अंग जाळी,
तरी माझ्या नशिबी
दारिद्र्याची होळी,
तारणारे आणि मारणारे तुम्हीच ना ????
मजवर हा अन्याय का ???
मजवर हा अन्याय का ???