शहीद सैनिक राजेंद्र भले यांच्या बलिदानाने पावन झालेल्या शिदवाडीच्या भूमीला “शहीद राजेंद्र नगर” नाव देणार : देशभक्तीचा २९ वर्षाच्या इतिहासात इगतपुरी तालुक्यातील पहिल्या शहीद स्मारकाचे भूमिपूजन

माजी सैनिक संघटना आणि ग्रामस्थांच्या साहाय्याने २६ जानेवारीपर्यंत स्मारक उभे राहणार

इगतपुरीनामा न्यूज, दि. २

देशसेवेचा ध्यास घेतलेल्या सैनिकांमुळे देशाची सुरक्षा तसेच आपण सुरक्षित आहोत. शहीद सैनिक राजेंद्र धोंडू भले यांच्या बलिदानाने पावन झालेल्या शिदवाडीच्या भूमीला देशभक्तीचा २९ वर्षाचा इतिहास आहे. या ‌देशभक्तीचा वारसा माजी सैनिकांद्वारे पुढे ‌चालवला जाणार आहे. इगतपुरी तालुक्यातील खैरगाव शिदवाडी येथे शहीद राजेंद्र भले यांच्या शहीद स्मारकाचे भूमिपूजन आज झाले. ह्या पार्श्वभुमीवर शिदवाडी गावाला “शहीद राजेंद्र नगर” असे नवे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ जानेवारी पर्यंत स्मारकाची निर्मिती आणि गावाचे नवे नाव नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास लोकनियुक्त सरपंच ॲड. मारुती आघाण यांनी व्यक्त केला. इगतपुरी तालुक्यातील खैरगाव शिदवाडी येथे शहीद सैनिक राजेंद्र धोंडू भले यांच्या शहीद स्मारकाचे भूमिपूजन इगतपुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. २९ वर्षांनी का होईना राजेंद्र भले ह्या शहीद सैनिकाला न्याय देऊन शहीद स्मारक निर्मित होत असल्याबद्धल उपस्थित मान्यवरांनी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष विजय कातोरे आणि संघटनेचे आभार मानले.

सभापती सोमनाथ जोशी, ॲड. मारुती आघाण, गुणाजी गांगड, अनिल परदेशी, अरुण गायकर आदींनी भूमिपूजन केले. यावेळी विरपत्नी गंगुबाई भले, वीरमाता सगुणाबाई भले, ललिताबाई भले, शहीद सुखदेव भले यांची वीरमाता आणि स्मारकासाठी भूदान करणारे गुणाजी गांगड, अनिल परदेशी यांना सन्मानित करण्यात आले. पत्रकारितेच्या माध्यमातुन माजी सैनिकांना मदत करणाऱ्या विविध पत्रकारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार झाला. स्मारक समितीचे अध्यक्ष विजय कातोरे, तुकाराम काजळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग गांगड, सभापती सोमनाथ जोशी, उपसभापती विठ्ठल लंगडे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे,  रघुनाथ तोकडे, भगीरथ मराडे, अण्णासाहेब डोंगरे आदी पदाधिकारी हजर होते.

देशसेवेसाठी प्राण देणाऱ्या हुतात्म्याचे स्मारक होत असल्याचे पाहून भाग्य लाभले. लाखो तरुण देशाची सेवा बजावत आहेत. त्यांच्यामुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. देशसेवेचे काम करणाऱ्या सैनिकांचे स्मरण करून तसेच अशा घटनांतून युवक व युवतींना स्फूर्ती घेणे आवश्यक आहे. राजेंद्र भले यांचे कर्तृत्व व यशोगाथा याचा आम्हाला अभिमान आहे. माणसाचे मोठेपण त्यांच्या वयावर नसून त्यांच्या कार्यावरून ठरते. आजच्या तरुण पिढीने शहीद भले यांची प्रेरणा घेऊन देशसेवेचा कामात सक्रीय व्हावे असा सूर उपस्थित माजी सैनिकांनी व्यक्त केला. यावेळी स्मारकासाठी इगतपुरीनामा न्यूज पोर्टलचे संपादक भास्कर सोनवणे यांनी २१००, भूमिपुत्र फाउंडेशनतर्फे ११०० रुपयांचा धनादेश आणि अनेक मान्यवरांनी आर्थिक मदत संघटनेकडे सोपवली. आनंदी गावंडा यांनी सैनिकांवरील स्वरचित कविता सादर केली.

कार्यक्रमप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष यादव पटेकर, कार्याध्यक्ष विजय कातोरे, उपाध्यक्ष शांताराम सहाणे, सचिव तुकाराम काजळे, विठ्ठल मेंगाळ, मणीराम मदगे, खजिनदार नंदू आंबेकर, प्रवक्ता जानकीराम शिंदे, जनसंपर्क प्रमुख बाळासाहेब चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख किरण वाजे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद बस्ते, सचिव पी. यु. चौधरी, सुखदेव कुकडे, हरीश चौबे, सुनील गुळवे, राजेंद्र मुसळे, सोपान मुसळे, भगवान सहाणे, मनोहर भोसले, गणेश राव, लक्ष्मीकांत पारनेरकर, गजानन पळशीकर, गोपीनाथ साबळे, अनिल नाठे, ज्ञानेश्वर शिंदे, योगेश खरोटे, प्रशांत जगदाळे, प्रशांत कडू, हिरामण आव्हाड, राजू कदम, विलास वारुंगसे, दत्तू बऱ्हे, दिलीप वारुंगसे, किसन हंबीर, रविंद्र शार्दुल, वामन टोचे, रोहन, वीर नारी पद्मिनी चव्हाण, गंगुबाई भले, ललिताबाई भले, नंदाबाई ताठे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!