बोर्ली भागात पर्यटनवृद्धीसाठी विविध विकासकामे आणि स्थानिकांना रोजगार मिळण्यासाठी पर्यटनमंत्र्यांशी भेट : उपसरपंच गोविंद भले यांच्या पाठपुराव्याला मिळणार यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

बोर्ली गावचा समावेश पर्यटन क्षेत्रात होऊन या ठिकाणी विविध सुविधा व विकासकामे व्हावीत. तरुणांना रोजगार मिळावा. गाव परिसर विकास होऊन येथील श्री संतोबा देवस्थान विकसित व्हावे अशी मागणी बोर्लीचे उपसरपंच गोविंद भले यांनी राज्याचे पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. संगमनेर कोळीवाडा येथील दंडकारण्य अभियान आनंद मेळावा या ठिकाणी भेट घेऊन त्यांनी सविस्तर चर्चा केली. गोविंद भले यांच्यासारख्या तरुण तडफदार, अभ्यासू लोकप्रतिनिधींनी ग्रामविकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून योगदान द्यावे असे ना.आदित्य ठाकरे म्हणाले.

निवेदनात असलेल्या मागण्यांबाबत ना. आदित्य ठाकरे यांनी तातडीने लक्ष घालून ह्या कामात सहभाग नोंदणी करण्यास सांगितले. यावेळी सरपंच मथुरा हिरामण झुगरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रदेश युवाध्यक्ष लकी जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्त जनार्दन माळी, काँग्रेस तालुकाध्यक्ष रामदास धांडे, युवा नेते राजू गांगड, के ग्रुप अध्यक्ष संदीप गवारी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख आकाश भले, के ग्रुप उपाध्यक्ष राजेंद्र घारे, उत्तर महाराष्ट्र युवाध्यक्ष दारासिंग पावरा, नाशिक जिल्हा संघटक गोविंद भले, जनार्दन केकरे, निलेश जुंदरे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.

बोर्ली परिसर पर्यटनासाठी अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. उपसरपंच गोविंद भले यांच्या पाठपुराव्याने ह्या भागात आगामी काळात विकासकामे उभी राहतील. यामुळे स्थानिकांना रोजगार तर मिळेलच पण जागृत देवस्थान संतोबा महाराज मंदिर परिसर लोकप्रिय होईल. उपसरपंच गोविंद भले आणि सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करतो.

- लकी जाधव, आदिवासी विकास परिषद प्रदेश युवाध्यक्ष

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!