आदिवासी ठाकूर समाजाचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्याआड : जेष्ठ नेते यशवंतराव ठमाजी आगिवले यांचे निधन

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८

आदिवासी म. ठाकर/ ठाकुर समाजाचे जेष्ठ नेते यशवंतराव ठमाजी आगिवले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. आपल्या समाजासाठी आपले सर्व आयुष्य खर्च करून समाजाला संघटित करणारे सर्वांचे लाडके नेतृत्व म्हणून ते ओळखले जात. सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सह्याद्री आदिवासी म. ठाकुर/ ठाकर समाज उन्नती मंडळ, राज्य कार्यकारिणी सदस्य, एकनिष्ठ भाजपा नेते असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. इगतपुरी तालुक्यातून ठाकूर समाजातुन झालेले आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती घडवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. यशवंतराव ठमाजी आगिवले यांचे निधन झाल्याचे समजताच ठाकुर समाजात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने अख्खा ठाकुर समाज पोरका झालायं अशी सहवेदना ठाकूर समाजातून व्यक्त करण्यात आली.

आदिवासी म ठाकूर-ठाकर समाज सेवा मंडळ नाशिक जिल्हाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजासाठी मोठे योगदान दिलेले आहे. इगतपुरी तालुक्यात वेगळा राजकीय ठसा उमटवण्यासाठी सिंहाचा वाटा आणि समाजाला एकत्र करून संबंध महाराष्ट्राला आदिवासी ठाकूर समाजाच्या एकजुटीचा आदर्श दाखवून देणारे त्यांचे नेतृत्व होते. नेतेगिरीने नाही तर सामान्य माणूस म्हणून सामान्यातील असामान्य अनमोल हिरा म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहिले. इगतपुरी तालुक्याचे समाजिक पितामह, सर्व क्षेत्रात पुरून उरलेले असे व्यक्तिमत्व होणे नाही. अशा मार्गदर्शक व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली..!
- ॲड. मारुती आघाण, लोकनियुक्त सरपंच खैरगाव
आदिवासी म. ठाकर/ ठाकुर समाजाचे जेष्ठ नेते यशवंतराव ठमाजी आगिवले यांची एक आठवण

Leave a Reply

error: Content is protected !!