इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
वाढदिवस असल्यावर केक शुभेच्छांचा वर्षाव, स्वागत समारंभ हा ठरलेला कार्यक्रम. मात्र नाशिक रनर्सचे अध्यक्ष नारायण वाघ यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त स्वतःच्या वया एवढा रन करून वाढदिवस साजरा करत असतात. एवढ्यावरच न थांबता ते त्यांच्यासोबत अनेक रनर्स यांना सोबत घेऊन ज्यांना जितके शक्य आहे तितके धावण्यास सांगतात. समाजामध्ये आरोग्याचे महत्त्व सर्वांना समजावे यासाठी सतत प्रयत्नशील असतात. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाला पर्याय नसल्याने नारायण वाघ यांच्याकडून नाशिक मध्ये रनर्सची संख्या वाढण्यासाठी सप्तशृंगी हिल मॅरेथॉनचे आयोजन करतात.
सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले नारायण वाघ यांनी आपला 58 वा वाढदिवस 58 किमी धाऊन साजरा केला. त्यांना नशिकचे नामांकित रनर्स माणिक निकम, संजय पवार, सचिन निकम, मनीषा रौंदळ, नितीन रौंदळ, मंगेश वाघ, श्रीकांत चिंचोलीकर, विलास पवार यांनी सोबत केली. रविवारी रात्री मॅरेथॉन चौक ते गंगापूर गावच्या आधीचा पेट्रोल पंपापर्यंत लॅप्स पद्धतीने रात्रभर रन करण्यात आला. या रनसाठी त्यांच्या परिवाराचा ही मोठा सहभाग होता. सकाळी पाच वाजता नाशिक मधील अनेक रनर्स यांनी या नाईट रनमध्ये सहभाग घेऊन रात्रभर रन करणाऱ्या रनर्स यांना त्यांनी प्रोत्साहित केले. सकाळी आठ वाजता 58 किमी रन पूर्ण झाला. त्याची सांगता कृषी नगर येथील ट्रॅकवर समारोप करून करण्यात आली. समारोपासाठी नाशिक रनर्सचे अनेक मान्यवर उपस्थित होते.