इगतपुरीत बिबट्याच्या मुक्तसंचाराने नागरिकांत भितीचे वातावरण : वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

इगतपुरी शहरातील चर्च हिल, कॉन्व्हेंट हायस्कूल परिसरात बऱ्याच दिवसांपासून परिसरातील नागरिकांना बिबट्याचे दर्शन नित्याचेच झाले आहे. ह्या परिसरातील कुत्र्यांची संख्याही कमालीची घटली आहे. या परिसरात शाळाही असून नागरिक भितीच्या सावटाखाली वावरत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले आहे. बिबट्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वनविभागाने तात्काळ या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

बिबट्याचा वावर असलेला व्हिडिओ पहा

Leave a Reply

error: Content is protected !!