ज्ञानेश्वर महाले, इगतपुरीनामा न्यूज, दि. ११
उत्तरप्रदेश येथील लखीमपूर येथे लभाजपाने केलेल्या शेतकर्यांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र बंद पाळण्यात आला होता. त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे शिवसेना, राष्ट्रवादी, इंदिरा काँग्रेस कडुन बंद पाळण्याचे आवाहन केले होते. आज बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार हिरामण खोसकर, शिवसेना तालुकाप्रमुख संपत चव्हाण, रवी वारुंगसे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बहीरू मुळाणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष संपत सकाळे यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर येथे रॅली काढण्यात आली. यावेळी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदन देण्यात आले.
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरी येथे शेतकर्यांचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु होते. परंतु तेथे भाजपाचे सरकार असुन केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या ताफ्याने शेतकर्यांना चिरडले. अगोदर पासुन भाजपाची भुमिका ही सामान्य जनतेच्या विरोधात असुन हुकुमशाही पद्धतीने अन्याय अत्याचार भाजपाने चालवलेला असल्याचे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी केले.
शेतकर्यांना चिरडणार्या आरोंपींना शासन करण्याऐवजी पाठीशी घालण्याचे काम भाजपा सरकार करीत आहे. शेतकर्यावर गाडी घालुन आंदोलन चिरडणार्या भाजपाच्या नेत्यांना अटक करावी व गरीब शेतकर्यांना न्याय मिळावा. संबंधितावर ३०२ चे गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केली. सामान्य शेतकर्यांना न्याय मिळावा व भाजपाच्या निषेधार्थ या बंद मध्ये काँग्रेसचे विनायक माळेकर, मधुकर लांडे, हरिभाऊ अंबापुरे, दिनेश पाटील, दिनकर मोरे, गणेश कोठुळे, बाळासाहेब कदम, दिलीप मुळाणे, राजाराम चव्हाण, भावडु बोडके, राजु बोडके, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, शहराध्यक्ष मनोज काण्णव, बहिरू मुळाने, युवक तालुकाध्यक्ष कैलास मोरे, कारभारी कोठुळे, अरूण मेढे,विजय गांगुर्डे, भिकुशेठ बत्तासे, रविंद्र भोये, पुंडलीक साबळे, हरीभाऊ बोडके, शिवसेनेचे समाधान बोडके, निवृत्ती लांबे, भुषण अडसरे, सचिन दिक्षित, संजय मेढे, नितीन पवार आदीसह महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्ते उपस्थित होते.