धर्माचे साधन असणाऱ्या मानवी शरीराला निरामय ठेवण्यासाठी आरोग्य उपकेंद्र उपयुक्त : मठाधिपती घुले ; आमदार खोसकर खासदार गोडसे यांच्याकडून पाडळी देशमुख ग्रामपंचायतीचे कौतुक

पाडळी देशमुखला आरोग्य उपकेंद्र भूमिपूजन आणि रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न

प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

“शरीर रक्षणम् खलू धर्मसाधनं” ह्या प्रमाणे धर्माचे साधन असणारे मानवी शरीर उत्तम आणि निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य उपकेंद्र उपयोगी आहे. मानवी हृदयातील स्थित असणाऱ्या परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी रुग्णवाहिका फायदेशीर आहे. पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, ग्रामपंचायत आणि जेएमटी कंपनीच्या माध्यमातून जनसेवेच्या ह्या कार्याची इतरांनी प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन जोग महाराज भजनी मठाचे मठाधिपती गुरुवर्य माधव महाराज घुले यांनी केले.

कल्पतरू ( जेएमटी कंपनी ) फाउंडेशनतर्फे पाडळी देशमुख येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन व रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज इगतपुरीचे मठाधिपती माधव महाराज घुले, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, कल्पतरू फाउंडेशन तथा जेएमटी कंपनी मुख्य अधिकारी निळकंठेश्वर, सारंग पांडये, बिरेंद्र रॉय, संतोष मोरे, बाजार समितीचे माजी संचालक सुनिल जाधव, आदिवासी नेते तुकाराम वारघडे, बाजार समितीचे संचालक विष्णु राव, वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी, महावितरणचे अभियंता धवल आगरकर, कचरू पाटील शिंदे, हभप अशोक महाराज धांडे, सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, माजी सदस्य कैलास धांडे, माजी सरपंच पोपटराव धांडे, विष्णु धोंगडे, फकिरराव धांडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्या भाषणातून आरोग्य उपकेंद्राबाबत पाठपुरावा करून जुना प्रश्न मिटवल्याबद्दल सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह कंपनी व्यवस्थापनाचेही अभिनंदन केले. आमदार हिरामण खोसकर व जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी आपल्या भाषणातून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांबद्दल गौरवोद्गार काढीत विकासकामांसाठी निधीचीही घोषणा केली. तर कोविड काळात आवश्यक असलेल्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य उपकेंद्राची इमारत व रुग्णवाहिका मिळणे ही मोठी व गरजेची बाब असुन पंचक्रोशीतील गावांच्या दृष्टीने मोठा प्रश्न मार्गी लागल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्ती पाटील जाधव यांनी केले.

कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच जयराम धांडे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ धोंगडे, संजय धोंगडे, रविंद्र घाटेसाव, दिनेश धोंगडे, किरण धांडे, रामभाऊ धांडे, निलेश चोरडिया, रवींद्र घाटेसाव, रतन धांडे, उत्तम धांडे, तानाजी धांडे, पोलीस पाटील मधुकर धांडे, महादू धांडे, रामकृष्ण धोंगडे, ठकाजी धांडे, भानुदास धांडे, दिलीप धांडे, रामदास जाधव, आरोग्यसेवक खैरनार, संजय संवत्सरकर, रवींद्र पाटील, आरोग्य सहाय्यक तानाजी अहिरराव, रामदास पिंटू धांडे, जयराम धोंगडे, रुग्णवाहिका चालक राजु गुळवे, भगवान धांडे आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना सरपंच खंडेराव धांडे यांनी तर सूत्रसंचालन प्रल्हाद धांडे यांनी केले. आभार उपसरपंच बाळासाहेब आमले यांनी मानले

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!