वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
इगतपुरी तालुक्यातील विविध समस्या व विकास कामांसाठी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीच्या शिष्टमंडळाने जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पंचायतराज समितीची भेट घेतली. अध्यक्ष संजय रायमुरकर व त्यांच्या समवेत असलेल्या सदस्यांची जिल्हा परिषदेच्या कार्यालयात भेट घेऊन तालुक्यातील विविध समस्या मांडल्या.
इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकविमा कंपन्या फसवत आहेत. पिकांचे नुकसान होऊनही या कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याबरोबर विविध विकास कामाबाबत माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी पंचायतराज समितीचे अध्यक्ष ना. संजय रायमुरकर, पंचायतराज समितीचे सदस्य आमदार महादेव जानकर, विक्रम काळे, किशोर दराडे, अंबादास दानवे, प्रदीप जयस्वाल, कैलास पाटील, संग्राम जगताप, किशोर पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर आदी सदस्यांबरोबर चर्चा केली. याप्रसंगी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, घोटीचे सरपंच रामदास भोर, माजी सरपंच संजय आरोटे, ग्रामपंचायत सदस्य हिरामण कडु, घोटी शहराध्यक्ष गणेश काळे, दिगंबर शिरसाठ, जयराम गव्हाणे, दिपक कोंबडे आदी उपस्थित होते.