इगतपुरीनामा न्यूज दि. 12 : बुंडी (राजस्थान) येथील ‘उमंग’ या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या ‘एक दिया बेटी के नाम’ या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन स्पर्धेत वणी (ता. दिंडोरी) येथील सौरभी बिपीन तुपे हिने प्रथम क्रमांक पटकावला. बेटी बचाओ-बेटी पढाओ मिशन अंतर्गत दीपावली कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून बालगटात वणीच्या सौरभीचा प्रथम तर छत्तीसगडच्या माधुरी भिलाईचा द्वितीय क्रमांक आला आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी दिव्यासह घेतलेले छायाचित्र पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहा देशांसह भारतातील अठरा राज्यातील स्पर्धक विविध गटातून सहभागी झाले होते. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि अकरा हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप असून नुकत्याच झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात सौरभीला गौरवण्यात आले. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.