सौ. माधुरी पाटील शेवाळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे
संवाद : ७५८८४९३२६०
आला काळ, महापूर
जशी जगबुडी झाली
बुडे काळोख्या रातिला
घरे-दारे पाण्याखाली..!!१!!
घळा पडल्या शेतास
गेल्या वाहूनिया वाटा
डोळ्या समोर दिसता
जशा त्सुनामीच्या लाटा..!!२!!
सोने-नाणे,भांडी कुंडी
चारा पाणी गुरे-ढोरे
आयुष्याच्या संसाराचे
रातोरात गेले सारे..!!३!!
अन्न खाऊची पाकिटे
मायेपोटी पाठवली
माणसाला वाचविण्या
माणुसकी कामी आली..!!४!!
गेला संसार वाहून
असा सहज पाण्यात
कसा करू उभा आता
दूर जाऊन काट्यात…!!५!!
पुरे तुझे देवा आता
शांत कर पर्जन्याला
किती करू विनवणी
घालू साकडे देवाला..!!६!!