इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्येचा दहाच्या आकड्यावर जवळपास २ आठवडे स्थिर होती। ती आता एक अंकी झाली असली तरी आता पुन्हा ५ ची अढी पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी रुग्ण संख्या ५ वर स्थिर आहे. आज आलेल्या अहवालानुसार ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या पाचवर कायम आहे. दरम्यान कमी झालेली आकडेवारी तालुक्यासाठी नक्कीच दिलासादायक असली तरी सर्वांनी कोरोना संबंधी आवश्यक त्या सर्व नियमांचे पालन करावे, मास्क आणि सॅनिटायझरचा योग्य पद्धतीने नियमित वापर करावा असे आवाहन तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी केले आहे
सध्या कोरोनाची धास्ती सर्वांनाच आहे.. अगदी कोणतेही उपचार घ्यायची लोकांची तयारी आहे, अशा परिस्थितीत किफायतशीर दरात उपलब्ध असलेलं बर्फानी आरोग्य प्लस हे आयुर्वेदिक प्रतिबंधक औषध आहे. रुग्णांसाठी बर्फानी आरोग्य प्लस म्हणजे फक्त औषध नाही, तुमच्या प्रियजणांसाठी ते सुरक्षा कवच आहे ! 7030288008