वाल्मिक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
मतदार संघात विकासासाठी कमी पडू देणार नाही. पाठपुरावा करून मतदार संघात विकासकामे मंजुर केली आहेत. श्रेय घेणे हे माझे उदिष्ट नसुन जनहिताची कामे करीतच राहील असा शब्द आमदार हिरामण खोसकर यांनी दिला. माणिकखांब येथे विविध विकास कामाच्या भुमिपुजन प्रसंगी बोलत होते.
इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथे आमदार खोसकर यांच्या हस्ते नळपाणी पुरवठा योजना, भूमिगत गटार, रस्ते काँक्रीटीकरण, पाणी शुद्धीकरण केंद्र, सभामंडप ह्या ३० लाखांचा विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन माळी, गोरख बोडके, तालुकाध्यक्ष रामदास धांडे, मनसे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, प्रकाश तोकडे, ज्ञानेश्वर कडु, बाळासाहेब लंगडे, पंढरी लंगडे, तुकाराम वारघडे, गोपाळ भगत, बाबुराव भोर, दौलतराव दुभाषे, खंडु परदेशी, कमलाकर नाठे, सरपंच अंजनाबाई गोविंद चव्हाण, उपसरपंच वनिता चव्हाण, मनसेचे उपतालुकाध्यक्ष भोलेनाथ चव्हाण, ग्रा. पं. सदस्य शाम चव्हाण, अशोक पगारे, गंगाराम गांगड, सुखराज म्हसणे, पिंटू चव्हाण, शाखाप्रमुख भारत भटाटे, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भटाटे, सदस्य संजय भटाटे, काशिनाथ गांगड, काशिनाथ शिद, लालु आडोळे, ज्ञानेश्वर भटाटे, संतोष चव्हाण, सुनील पगारे, वसंत चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, गोकुळ चव्हाण, निवृत्ती चव्हाण, भाऊसाहेब सोनवणे, बाळकृष्ण जोशी, तुकाराम चव्हाण राजु चव्हाण, मारूती चव्हाण, हारिश्चंर आडोळे आदी उपस्थित होते.