इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
इगतपुरी तालुक्याची कोरोना रुग्णसंख्या नीचांकी पातळीवर येत आहे. नवे कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण सुद्धा खूपच घटले आहे. त्यामुळे तालुकवासीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. आगामी काळात इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याचे जास्त संकेत मिळत आहेत.
आज सायंकाळी ५ वाजेपर्यंयच्या अहवालानुसार इगतपुरी तालुक्यात १० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज फक्त अवघ्या ३ व्यक्तींचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. आज दिवस अखेर पर्यंत फक्त ४४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. थोडीफार लक्षणे होती. मनाला काळजी वाटायला लागली. माझे नातेवाईक माधव बोकड ( चुंचाळे ) यांनी मला बर्फानी आरोग्य प्लस आयुर्वेदिक औषधीची माहिती दिली. विलगीकरणाबरोबर ह्या आयुर्वेदिक गोळ्यांचेही नियमित सेवन केल्याने लक्षणे निघून गेली. आठवडाभराने पुन्हा कोरोना चाचणी केली. ही चाचणी निगेटिव्ह आली. आमचा परिवार आणि नातेवाईक, मित्र मंडळी आता सगळे ह्या गोळ्यांचे सेवन करून कोरोना पासून स्वतःचा बचाव करत आहोत.
- बाजीराव माळेकर, माळेकरवाडी वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी