इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
आज नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागा मार्फत १५ आरोग्य सेविका यांना पदोन्नती मिळून आरोग्य सहाय्यीकापदी विराजमान झाल्या आहेत. बरेच दिवसापासून आरोग्य सेविका पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होत्या. अखेर दिनांक २१ मे, २०२१ रोजी प्रतिक्षेतील आरोग्य सेविका यांना आरोग्य सहाय्यीका झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. नियमित पदोन्नती प्रक्रिया अंतिम करणेकामी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (भाप्रसे), मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( साप्रवि ) आनंद पिंगळे, प्रभारी समाजकल्याण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर व सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल गीते, सर्व कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचे पदोन्नती झालेल्या आरोग्य सेविका भगिनी यांनी आभार मानले आहे.
पदोन्नती झालेल्या आरोग्य सेविका यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दूरध्वनी करुन रिक्त पदावर इच्छेनुसार पदोन्नती पदस्थापणा दिली त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.
कोरोना साथरोग काळात पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचारी म्हणून काम करत असतांना पदोन्नती देऊन आमच्या आरोग्य सेविका भगिनींचा सन्मान केला अशा भावना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या अध्यक्षा शोभा खैरनार यांनी व्यक्त केल्या आहेत.
पदोन्नती झालेल्या आरोग्य भगिनींचे नर्सेस संघटनेच्या राज्याध्यक्षा शोभा खैरनार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष मधुकर आढाव, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष विजय देवरे, नाशिक जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे संचालक बाळासाहेब ठाकरे, दीपक आहिरे, आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय सोपे, राजेंद्र बैरागी, औषध निर्माण अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फैय्याज खान, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पगार, बाळासाहेब कोठुळे, श्रीकांत आहिरे यांनी अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. ( बातमी लेखन : जी. पी. खैरनार, नाशिक )