“भूषणावह”: “सदैव तत्पर सेवेसाठी, एकनिष्ठ लोकांशी..!” : नाही नुसते पोकळ भाषण… लोकांसाठी कायमच उभा जाधव भूषण 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याच्या लहान मोठ्या व्यक्तिगत समस्या आणि प्रश्न आ वासून उभे ठाकतात. यापैकी आरोग्यासंबंधी अडचण उभी राहिल्यास ते कुटुंब हादरून गेल्याशिवाय राहत नाही. तातडीच्या वैद्यकीय आजारापणात रुग्णालयात दाखल होण्यापासून खर्चिक तपासण्या, महागडे उपचार ते भरमसाठ बिल यामुळे सामान्य माणूस अर्धमेला होतो. अशा बिकट परिस्थितीत सर्वांना आदर्श आणि “भूषणावह” वाटेल अशी दर्जेदार कामगिरी करणारा व्यक्ती पाहिल्यावर परमेश्वराचे आभार व्यक्त होतात. रक्ताच्या कणाकणात समाजाची प्रामाणिक सेवा आणि अडल्या नडलेल्या सामान्य माणसाला निर्मळ मदत करण्याचा डीएनए असणारे भूषण प्रभाकर जाधव हे खऱ्या अर्थाने “आरोग्यदूत” आहे. इगतपुरी शहरासह गावठा भागातील सामान्य नागरिकांनी आपल्या कुटुंबातील घटक मानलेले भूषण जाधव यांची गेल्या अनेक वर्षातील कामगिरी उल्लेखनीय आहे. दिवसाचे २४ तास लोकांसाठी स्वतःचे वाहन, रुग्णवाहिका उपलब्ध करून देत रक्ताच्या मोफत तपासण्या आणि अविश्रांत जनसेवा करण्यात भूषण जाधव आघाडीवर असतात. अनेक सामाजिक सेवा करून लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेला हा युवक “नगरसेवक” व्हावा म्हणून नागरिकांनी आतापासूनच त्यांना आशीर्वाद आणि पाठिंबा देणे सुरु केले आहे. इगतपुरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ४ मधून त्यांना अभूतपूर्व पाठिंबा मिळत असून सर्व नागरिकांनी त्याच्यासाठी स्वतः सक्रिय सहकार्य करण्यासाठी कंबर कसली आहे. इगतपुरी शहराच्या विकासासाठी भूषण जाधव यांच्यासारखा “सदैव तत्पर सेवेसाठी, एकनिष्ठ लोकांशी..!” ब्रीदवाक्यानुसार काम करणारा नगरसेवक पाहिजे अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात.

वडील प्रभाकर जाधव, आई संगीता जाधव यांच्या सुसंस्कृत कुटुंबातून लोकांच्या हृदयातील परमेश्वराला प्रसन्न करण्याचे बाळकडू भूषण जाधव यांना मिळालेले आहेत. भाऊ गोविंद जाधव हे नामांकित एसएमबीटी रुग्णालयाचे लॅब इनचार्ज आहेत. त्यांच्याकडून सुद्धा इगतपुरीसह प्रत्येक नागरिकांना उत्तम सेवा दिली जाते. “आरोग्यदूत” भूषण जाधव हे स्वतः. इगतपुरी शहरात स्वतःची विघ्नहर्ता पॅथॉलॉजी लॅब चालवतात.  त्या माध्यमातून त्यांनी आज पर्यंत अनेक गरजवंत नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या आहेत. कोरोनाच्या भयंकर काळात लोकांची सेवा करतांना ते तब्बल २ वेळा बाधित झाले. तरीही त्यांनी जीवाची पर्वा न करता समाजकार्याचा वसा सुरूच ठेवला. ते स्वखर्चाने तातडीच्या प्रसंगी अर्ध्या रात्रीही रुग्णालयात जाण्यासाठी स्वतःची गाडी आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देतात. शेकडो गरिबांना मोफत आरोग्य तपासण्या करून निदान झालेल्या आजाराचा उपचार मिळवून दिला. अनेकांचे बहुमोल प्राण वाचवण्यासाठी आरोग्यदूत भूषण जाधव यांची मदत उपयोगी पडलेली आहे. यासह इगतपुरीच्या मुसळधार पावसापासून बचाव व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप केल्या. शिवशक्ती मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत नावलौकिक मिळवले. आदर्श रुग्णमित्र म्हणून इगतपुरी तालुक्यात त्यांच्या कार्याचा नेहमीच गौरव केला जातो. ह्याच कामांची पावती म्हणून त्यांना शिवसेना शिंदे गटाचे इगतपुरी शहराध्यक्षपद मिळाले. लोकांची कोणतीही समस्या असली तरी ती सोडवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यापासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणारे भूषण जाधव लोकांच्या मनातले खरे नगरसेवक आहेत. लोकांसाठी पायाला भिंगरी लावून “भूषणावह” कार्य करणारे भूषण जाधव समाजसेवेचा वसा पुढे नेण्यासाठी यंदा इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. प्रभाग क्रमांक ४ मधून ते लोकांचा आशीर्वाद, प्रेम आणि सामाजिक कार्य यांच्या जोरावर “नगरसेवक” म्हणून इगतपुरी नगरपरिषदेत विराजमान होतील यात अजिबात संशय नाही.

error: Content is protected !!