
इगतपुरीनामा न्यूज – आपल्या लेखणीद्वारे समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांचे प्रश्न आणि समस्या सोडविणारे पत्रकार हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. अतिशय बिकट अशा काळामध्ये संघर्ष करून पत्रकारांच्या मदतीने प्रशासन ठिकाणावर येऊन जनतेची कामे करीत असते अशा पत्रकारांना आपल्या बातम्या करताना इगतपुरी तालुक्यात असणारी विध्वंसक प्रवृत्तीचे लोक अथवा माणसे अडथळा आणण्याचे महापाप करतात. बातमी करू नये, बातमी केली म्हणून हुज्जत घालून शिवीगाळ आणि संपवून टाकू अशी भाषा वापरली जात आहे. हे निकोप लोकशाही नसल्याचे मोठे उदाहरण ठरावे व्हॉईस ऑफ मिडियाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष तथा पुढारीचे न्यूजचे प्रतिनिधी विकास काजळे यांना अशाच गुंड प्रवृत्तीच्या टग्यांनी खुनाची आणि मारहाणीची दिलेली धमकी तीव्र शब्दात निषेधास पात्र आहे. विकास काजळे हे पत्रकारिता करतांना अतिशय संयमीपणाने काम करून समाजाला न्याय देतात. आजची झालेली घटना विघातक प्रवृत्ती डोके वर काढत असल्याचे चिन्ह आहे. घोटी शहरातील जेष्ठ लोकांचा सन्मान करून आज घोटी पोलिसांत दिली जाणारी फिर्याद मागे घेऊन विकास काजळे यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. पण आम्ही सर्व पत्रकार इशारा देतो की, आजपासून इगतपुरी तालुक्यातील कधीही कोणत्याही पत्रकाराला शिवीगाळ, धमक्या, संपवण्याची धमकी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. संबंधित सैतानी प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी पत्रकार बांधव सज्ज आहेत, हे लक्षात घ्यावे. इगतपुरी तालुक्यातील पोलीस प्रशासनाने गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी यानिमित्ताने पावले उचलावीत अशी अपेक्षा आहे. इगतपुरी तालुका व्हॉइस ऑफ मिडीयाने गुंड प्रवृत्तीला सज्जड इशारा दिला असून घोटी पोलिसांशी चर्चा करण्यात आली.