देशाच्या राष्ट्रपतींकडून मोडाळेच्या सरपंच शिल्पा आहेर राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित : राष्ट्रपतींकडून झालेल्या गौरवाचा सुवर्णक्षण पाहून सार्थक अन धन्य झालो – गोरख बोडके

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्रातुन इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायतीला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देऊन सन्मानित केले. राजधानी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात संपन्न झालेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभात मोडाळेच्या सरपंच शिल्पा आहेर, ग्रामसेवक हनुमान दराडे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्काराचे सन्मानपत्र, ट्रॉफी देऊन गौरव केला.  माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. राष्ट्रीय पंचायत राज मंत्री ना. राजीवसिंह यांनी यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या कार्याची प्रशंसा करून मोडाळे गावाचे कौतुक केले. पुरस्काराची ५० लाख रुपयांची रक्कम मोडाळे ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात आली. संयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध ९ श्रेणीतील सतत विकासाच्या मानकांनुसार स्वच्छ आणि हरित पंचायत म्हणून इगतपुरी तालुक्यातील मोडाळे ग्रामपंचायत पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते. राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने माझ्या गावाचा देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतींनी गौरव केल्याचा सुवर्णक्षण पाहून सार्थक आणि धन्य झालो अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी दिली.

Similar Posts

error: Content is protected !!