नाशिकचा बालकवी पियुष गांगुर्डे याने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त केलेली कविता
बालकवी पियुष चंद्रकांत गांगुर्डे
काय सांगू माझ्या
महाराष्ट्राची महती
मावळ्यांच्या रक्तानं
अन् शेतकऱ्यांच्या घामानं
पावन झालेली ही माती
चोहो दिशांना पसरली
माझ्या महाराष्ट्राची ख्याती
इथे घडल्या बहिणाबाई
जनाबाई सखूबाई
शेकडो वर्षांनी
महाराष्ट्राला तख्त मिळवून
देणाऱ्या जिजाबाई शंभूराजांच दुःख विसरून
स्वराज्य लढवणाऱ्या
येसूबाई
इथेच घडला
दिल्लीच्या तख्ताला
घाम फोडणारा
राजा शिवाजी
असंख्य यातना सोसून
स्वराज्यापायी इमान
राखणारा
राजा संभाजी
मुघलांच्या फौजेत घुसून
तंबूचा कळस
आणणारा संताजी
इथेच घडले तुकोबाराय
नामदेव ज्ञानेश्वर माऊली
अवघ्या महाराष्ट्राला दिली
त्यांनी भक्तीची सावली
नवऱ्यासाठी देवाशी
भांडण करणारी
तुकोबारायांची आवली
इथेच घडले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्यांनी दिले संविधान
इथेच घडले टिळक
ज्यांनी तुरुंगात केले
गितारहस्याचे लिखाण
इथेच घडले राजगुरु
ज्यांनी राष्ट्रसेवेसाठी
वेचिले प्राण
इथे आहेत
भीमा गोदावरी इंद्रायणी
बळीराजाच्या शेतास
देतात पाणी
माझ्या बळीराजाच शेत
जणू सोन्याच्या खाणी
इथे आहेत
दूग्धव्यवसायावर छाप
पाडणारे काका चितळे
हे उद्योगपती
इथेच आहेत
मुकेश अंबाणी
ज्यांनी रिलायंस जिओ
दिले जगासाठी
इथे आहेत
नाशिकचे द्राक्षे
संत्री नागपूरची
चिकू घोलवडचे
अन् केळी जळगावची
रत्नागिरीचा आंबा
स्ट्राॕबेरी महाबळेश्वरची
इथेच आहे
विदर्भाची वऱ्हाडी
खानदेशची अहिराणी
कोकणची कोकणी
अन् मालवणची मालवणी
कुठलीही भाषा घ्या
आहेच ती मंजूळवाणी
इथेच किल्लेही प्रसिद्ध
आहेत पर्यटनात
भंडारदरा वेरूळ अजिंठा
महाबळेश्वरही
करतील जागा मनात
चला तर मग
फिरायला या महाराष्ट्रात
इथे आहे
शिक्षण शाळा
हिच परंपरा
फुले शाहू सावित्रीने
पोहचविले हे घराघरा
( बालकवी पियुष चंद्रकांत गांगुर्डे हा इयत्ता ७ वी मध्ये
जनता विद्यालय, पवननगर, नाशिक ह्या शाळेत शिकतो. )
Comments