कवितांचा मळा – तुझ्याविना …!

कु. सोनाली कोसे, चंद्रपूर, 9322482768

सारं काही अधुरं
फक्त तुझ्याविना
प्राण तूच माझा
राहवेना तुज आठवल्याविना

नाव तुझेच अंतरी
श्वासात तूच माझ्या
नशा ही प्रितीची
अंगात भिनावी तुझ्या

तुझ्याविना नकोसे जीवन
नको वाटे मज दुरावा
निस्वार्थी असावी साथ
सोबत तुझा सहवास हवा

तुझ्याचसाठी झाला
वेडापिसा जीव हा
दरवळावा प्रेमगंध नवा
जन्मोजन्मीचा हात हवा हा

तुझ्याविना खरचं मला
जिवंतपणी मरण वाटे
एकांताच्या वळणावर
नयनी माझ्या अश्रु दाटे

Similar Posts

error: Content is protected !!