
इगतपुरीनामा न्यूज – गोंदे दुमाला येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. जागतिक सल्लागार संतोष सांगळे व सहकारी यावेळी मार्गदर्शन करणार आहे. यामध्ये वजन वाढवणे, कमी करणे, जास्त एनर्जी स्त्रियांचे आजार, लहान मुलांच्या आहार मार्गदर्शन, पाचक आरोग्य योगा प्राणायाम व बांबू वर्क यावर सखोल असा मार्गदर्शन मिळेल. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून संघटक सचिव प्रदेश उमेश खातळे , तालुकाध्यक्ष काशिनाथ कोरडे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब खातळे, शहराध्यक्ष आकाश पारख, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अमजद पटेल उपस्थित राहणार आहे. मारुती मंदिर सभागृह गोंदे दुमाला येथील मोफत आरोग्य शिबीर आणि तपासणीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.