इगतपुरीनामा न्यूज – तळोघ, ता. इगतपुरी येथील मदन किसन कडू यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या नांदगाव सदो जिल्हा परिषद गटप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, नाशिक जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, माजी आमदार शिवराम झोले, इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे आदींच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करणार असून पक्षकार्याचा विस्तार करण्याचे अभिवचन नवनियुक्त गटप्रमुख मदन कडू यांनी यावेळी दिले.
इगतपुरी तालुक्यात मदन कडू यांचा मोठा जनसंपर्क असून गोरगरीब नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा चांगला हातखंडा आहे. विद्यार्थीदशेपासून सामाजिक आणि राजकीय कार्यात त्यांचा लक्षणीय सहभाग असतो. विविध सामाजिक, आध्यात्मिक उपक्रम राबवत त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमदा गटप्रमुख लाभला आहे असे प्रतिपादन प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी यावेळी केले. मदन कडू यांच्या निवडीबद्धल ज्येष्ठ नेते रतन जाधव, बाळासाहेब झोले, गणपत जाधव, माजी सभापती विष्णू चव्हाण, आगरी सेना तालुकाध्यक्ष नारायण वळकंदे, हरीश चव्हाण, राहुल साने, निवृत्ती भगत, गोपाळ पाटील, पांडुरंग खातळे, ईश्वर भागडे, जिल्हा पदाधिकारी अरुण पोरजे, संजय कोकणे, वसीम सय्यद, नामदेव वाघचौरे, गणपत करवर, भागा भगत, कृष्णा गांगड, भास्कर भले, लक्ष्मण आगिवले, मच्छिंद्र लंगडे, सोमनाथ आगिवले आदींनी आनंद व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.