टिटोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज – टिटोली जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली. गावातुन प्रभातफेरी काढत डॉ. आंबेडकरांच्या जीवन कार्याचा परिचय देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या भाषणासोबतच डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपरिचयावर आधारीत नाटिका आणि नृत्य सादर करण्यात आले.  विद्यार्थ्यांना खाऊ आणि लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेतील शिक्षक रामदास गंभीरे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपसरपंच अनिल भोपे यांनी डॉ. आंबेडकर यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. आंबेडकर यांनी ज्या प्रकारे १८ तास अभ्यास करत अगदी  गरीब परिस्थितीवर मात करून जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवला त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी एक सुजाण नागरिक बनण्यासाठी अभ्यास करावा आणि उच्च शिक्षण घ्यावे असा संदेश दिला. कार्यक्रमप्रसंगी सरपंच कोमल हाडप, उपसरपंच माया भडांगे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य भरत हाडप, संदिप भडांगे, सुरज भडांगे, नटराज भडांगे, सुरेश भडांगे, उत्तम भडांगे, योगेश भडांगे, सिध्दार्थ भडांगे, अनिकेत भडांगे, गणेश भडांगे, रुख्मिणी भटाटे, अंगणवाडी कार्यकर्त्या, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिध्दार्थ सपकाळे यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!