
इगतपुरीनामा न्यूज – पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे, पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे, जगात गोड्या पाण्याचे प्रमाण मुळातच फार कमी आहे. स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले तर पाण्याची टंचाई कमी करण्यास मदत होईल असा विश्वास अखिल भारतीय दिगंबर जैन महिला परिषद माटुंगा मुंबईच्या अध्यक्षा आणि पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा प्रगती अजमेरा यांनी व्यक्त केला. होळी, जागतिक जलदिन या निमित्ताने फाउंडेशनच्या सदस्या पूजा गगवानी, शशी बजारी, संतोष मोदी, गुरुदेव दुरा, सुमिता बैद, मंजू बजाज, विजयालक्ष्मी दालमिया, निलम सेक्सरिया, स्नेहा रुंगठा, विणा जालान, मंजू केजरीवाल यांच्या उपस्थितीत भगतवाडी, धामडकी जिल्हा परिषद शाळेत पर्यावरणपूरक होळी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंजू बजाज, विजयालक्ष्मी दालमिया यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना पुरीभाजी, गोड शिरा जेवण, सुमिता बैद, विणा जालान यांच्यातर्फे कुरकुरे, बिस्कीट, माझा ज्यूस, चॉकलेट देण्यात आले. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी प्रास्तविक करून कार्याचा आढावा घेतला. शालेय आवारात पर्यावरण पूरक होळी पेटवून पर्यावरण रक्षणाचे महत्व समजावून दिले. विद्यार्थ्यांसोबत फुलांची मनसोक्त उधळण करण्यात आली.
बालगोपाळांचा अत्यंत आवडीचा सण म्हणजे होळी..सणाच्या निमित्ताने गोड पदार्थांवर ताव मारून पिचकाऱ्यांमधून एकमेकांवर रंग उडवण्यासाठी बच्चे कंपनी आतुर असते. होळी सणाचा आनंद घेण्यासाठी मुंबईचे पेहेचान प्रगती फाउंडेशन अखिल भारतीय दिगंबर जैन महिला परिषद माटुंगा यांच्या मदतीने इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी आणि भगतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत शानदार होळी उत्सव साजरा करण्यात आला. होळीसाठी झाडांची तोड न करता, पाण्याचा अपव्यय न करता पर्यावरणपूरक होळी साजरी झाली. फाउंडेशनच्या सदस्यांसमवेत विद्यार्थ्यांनी फुलांची उधळण केली. पर्यावरणपूरक सण साजरा केल्याने अत्यंत आनंददायी वातावरण निर्माण झाले होते. होळीच्या अग्निसोबत जे चुकीचे आहे ते जळून नष्ट होवो, नकारात्मकता भस्मसात होवो, गरिबी जाऊन समृद्धी येवो, अभ्यासात येणारा व्यत्यय नाश होवो अशा घोषणा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दिल्या. ह्या कार्यक्रमांत पेहेचान प्रगती फाउंडेशन आणि अखिल भारतीय दिगंबर जैन महिला परिषद अध्यक्षा प्रगती अजमेरा, पूजा गगवानी, शशी बजारी, संतोष मोदी, गुरुदेव दुरा, सुमिता बैद, मंजू बजाज, विजयालक्ष्मी दालमिया, निलम सेक्सरिया, स्नेहा रुंगठा, विणा जालान, मंजू केजरीवाल यांनी सहभाग घेतला. यावेळी शिक्षिका वृषाली आहेर, सौरभ अहिरराव, दत्तू निसरड, गोकुळ आगिवले उपस्थित होते.