इगतपुरीनामा न्यूज, दि. 27
ग्रामपंचायत टिटोली आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बोरटेंभे यांच्या सौजन्याने आज टिटोली येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये संपन्न झाला. सर्वच नागरिकांना सोयीचे व्हावे म्हणून जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा टिटोली येथे कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ह्या कार्यक्रमाला गावकऱ्यांसह परिसरातून प्रचंड प्रतिसाद लाभला. सोशल डिस्टन्सचे पालन, सॅनिटायझरचा वापर आदी सर्व नियमांचे पालन करून लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली. ग्रामपंचायतीमार्फत सर्व नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी प्रथम लस देण्यात आली. परिसरातील विविध फ्रंट वर्कर्स शिक्षक, पोलीस, महसूल कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी यांनाही लस देण्यात आली.
याप्रसंगी ग्रामपंचायत टिटोलीचे उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती टिटोली शाळेचे अध्यक्ष अनिल भोपे, इगतपुरी बिट विस्ताराधिकारीअशोक मुंढे, इगतपुरी २ केंद्राचे केंद्रप्रमुख राजाराम जाधव, संदीप भडांगे, काळू बोंडे, दशरथ हाडप, भरत हाडप, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नाईकवाडी, आरोग्य सेवक एस.टी लोखंडे, आरोग्य सहाय्यक वाणी नाना , पुजा पगारे, नयना वाघ, टी. आर. चौधरी, आरोग्य सेविका एस. एम. नरवडे, शांता गुंजाळ, रुक्मिणी भटाटे, खलदकर परिचर, शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला शार्दुल यांनी ज्ञानमंदिराचे दरवाजे खुले करून देत सोबत शिक्षिका मंगला धोंडगे, प्रतिभा सोनवणे तसेच सिध्दार्थ सपकाळे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. लस सुरक्षित आहे. सर्वांनी लस घ्या आणि सुरक्षित रहा असा संदेश शिक्षकांनी दिला.
ज्ञानाच्या मंदिरात
आरोग्याचे धडे गिरविले
वैश्विक महामारी बचावासाठी
दरवाजेही उघडले…. !
उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने माझ्या गावकऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण आयोजित केले. माझ्या गावकऱ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणात लस घेतली. लस अतिशय सुरक्षित असल्याने उर्वरित सर्वजण गावकरी लस घेणार आहेत.
– अनिल भोपे, उपसरपंच टिटोली