इगतपुरीनामा न्यूज : राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात इगतपुरी तालुक्यातील ज्ञानदा माध्यमिक विद्यालयाने इगतपुरी तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने जिल्ह्यात उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले आहे. दोन्ही शाळांच्या यशाबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदा विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडाळे या शाळेने चांगले यश पटकावल्याचा अभिमान वाटतो असे येथील शिक्षक आणि विद्यार्थी म्हणाले. राज्यातील शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’, ‘महावाचन महोत्सव’, ‘माझी शाळा, माझी परसबाग’, व ‘स्वच्छता मॉनिटर-टप्पा २’, या अभियानांची अंतिम टप्यात अंमलबजावणी सुरू आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमातील विजयी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मुख्यमंत्र्यांसोबत स्नेहभोजन करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमात राज्यातील सुमारे एक लाख एक हजार शाळांनी आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील शाळा चांगल्या प्रकारे यश मिळवत असल्याचा आनंद वाटतो असे गोरख बोडके म्हणाले.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group