
इगतपुरीनामा न्यूज – खैरगावचे भूमिपुत्र माजी सैनिक किसन हंबीर यांना किड्स किंग्डम एज्युकेशन सोसायटी व ज्ञानदर्पण साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने “ज्ञानदर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. निवृत्त पोलीस अधिकारी संजय अपरांती, भारत हबीब सय्यद यांच्या हस्ते त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कार देण्यात आला. माजी सैनिक किसन हंबीर यांनी सैन्यदलात जम्मू काश्मीर, सिक्किम, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, महू या ठिकाणी २२ वर्ष सेवा केली. देशप्रेमामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना भारतीय सैन्यात पाठवले. त्यांची दोन्ही मुले भारत मातेचे रक्षण करत आहेत. माजी सैनिक विजय कातोरे, वीरनारी वीरमाता बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापकीय अध्यक्षा रेखा खैरनार, माजी सैनिक हरीश चौबे, गोकुळ धोंगडे, आदींनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.