रचना : जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
तहकूब झाल्या परीक्षा,
अजब घडला इतिहास !
सूक्ष्म जीवांचे शास्र,
सोपा होता अभ्यास !!
जिवाने काढले अस्त्र,
वार करी फुफ्फुसास !
सूक्ष्म जीव विषाणूने,
माणसे होई खल्लास !!
प्रताप केला हो सारा,
विषाणु जीवशास्राने !
मानवाचे मानसशास्त्र,
बिघडविले कोरोनाने !!
समाजशास्राचा गुण,
माणसे सैरभैर होता !
जीव मानवाची व्यथा,
दिसे भयाण शांतता !!
मानव बुद्धीचा अभ्यास,
करी नागरिकांचे शास्र !
कस पाहून मानवाचा,
कोलमडले अर्थशास्त्र !!
उपाय करण्या माणसां,
रसायनशास्त्र असे भारी !
शास्रज्ञ जीव विषाणूंचे,
सखोल संशोधन करी !!
व्यापती विषाणू सारे,
पृथ्वीचा भूगोल सारा !
शास्रज्ञ अभ्यास करी,
उपाय शोधती खरा !!
विषाणूस त्या रोखण्या,
अस्र शोधी भूमितीत !
शोधून लसीच्या मात्रा,
गणित जुळवी मानवात !!
एका सूक्ष्म विषाणुने,
शास्त्रच बोथट होई !
मानवा जीवदान देण्या,
पोलीस डॉक्टर येई !!
धरा मानवतेची कास,
शास्त्र असे खुप भारी !
मायबोली गोड भाषा,
मानवास देई उभारी !
( कवी जी. पी. खैरनार हे नाशिकच्या जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक असून विविध विषयांवर लेखन करतात. )