माणिकखांब – बेफाम मोटारसायकलीची साई भक्तांना धडक, २ गंभीर, २ किरकोळ जखमी

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब भागात बेफाम रायडिंग करणाऱ्या रायडरने आज चार पाच साईभक्तांना धडक दिली आहे. या अपघातात दोन साई भक्तांना गंभीर दुखापत झाली असून दोघांना किरकोळ मार लागला आहे. किरकोळ जखमींना घोटीच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या दोघांना मुंबईला हलवण्यात आले आहे. नाशिक शिर्डी महामार्ग आणि मुंबई नाशिक आग्रा महामार्ग परिसरातून बेफामपणे रायडिंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर आता कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या आठवड्यात याच परिसरामध्ये एका रायडरच्या बेफाम रायडिंगने एकाचा बळी घेतला होता. त्यामुळे अशा रायडर वर कारवाई करण्याची मागणी आहे. वाहतूक विभाग अशा रायडर वर कारवाई करणार का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे

Similar Posts

error: Content is protected !!