
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारात ३ अज्ञात हल्लेखोरांनी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या MH 04GM 8051 या वाहनावर कोयता आणि चॉपरने हल्ला केला. या घटनेत मोबाईल व सोने असा दीड लाख रुपयांचा ऐवज लुटण्याची घटना मध्यरात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान घडली आहे. या खाजगी वाहनातून दिवा येथील पाच नागरिक प्रवास करत होते. वाहनातील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत पळ काढत आपला जीव वाचवला. त्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घोटी पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. या संदर्भात तीन संशयितांच्या विरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.